Like Pope Francis' bikini model

पोप यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा एकदा बिकिनी घातलेल्या एका मॉडेलचा फोटो लाईक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. २३ डिसेंबर रोजी ‘मार्गोट’ नावाच्या एका बिकिनी मॉडेलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करून पोप यांनी आपला फोटो लाईक केल्याचा दावा केला आहे. तिने शेअर केलेला स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दिल्ली : ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच पोप फ्रान्सिस यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ब्राझीलच्या एका मॉडेलचा चक्क बिकिनीमधील फोटो लाईक केल्याचे समोर आले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.

पोप यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पुन्हा एकदा बिकिनी घातलेल्या एका मॉडेलचा फोटो लाईक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. २३ डिसेंबर रोजी ‘मार्गोट’ नावाच्या एका बिकिनी मॉडेलने ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करून पोप यांनी आपला फोटो लाईक केल्याचा दावा केला आहे. तिने शेअर केलेला स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

स्क्रीनशॉट शेअर करताना, “uhhh, पोप यांनी माझा फोटो लाईक केला?? पोप यांनी माझा फोटो लाईक केला म्हणजे मी आता स्वर्गात जाणार”, असे मजेशीर ट्विट मार्गोटने केले आहे. काही दिवसांपूर्वीच पोप यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ब्राझीलची बिकिनी मॉडेल नतालिया गरिबोटो हिचा तोकड्या कपड्यांमधील एक फोटो लाईक करण्यात आला होता. तो स्क्रीनशॉटही प्रचंड व्हायरल झाला, त्यानंतर नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यावर पोप यांच्या अकाउंटवरुन तो फोटो ‘अनलाईक’ करण्यात आला.