coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर मॉनसेफ स्लॅवोई यांनी सांगितले की, लसीमुळे लोकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

दिल्ली. कोरोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू असताना दुसरीकडे त्याला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका, ब्रिटनने फायजर-बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. फायजरच्या लस वापराने लसीकरण सुरू करण्यात आले असताना ही लस घेतल्यानंतर अनेकांना एलर्जीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. ही संख्या अंदाजापेक्षाही अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर मॉनसेफ स्लॅवोई यांनी सांगितले की, लसीमुळे लोकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. इतर लशींच्या तुलनेत फायजरची कोरोना लस टोचल्यानंतर ॲलर्जी होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेसह ब्रिटनमध्येही फायजरची लस दिल्यानंतर काहींना त्रास जाणवला होता. मात्र, काही तासांमध्ये त्यांची प्रकृती चांगली झाली. लस निर्मिती करणारी कंपनी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यात ॲलर्जीचा त्रास होऊ नये यासाठी औषध घेणाऱ्या व्यक्तींना लस कशी द्यायची याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर नागरिकांना ॲलर्जीचा त्रास का होतो, याबाबत अमेरिकन प्रशासनाचे लक्ष असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लस आणि ॲलर्जीबाबत अभ्यास करण्यात येणार असून यामध्ये १०० जणांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध गोष्टींची ॲलर्जी असलेल्या व्यक्तिंचा समावेश असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये हे संशोधन, अभ्यास सुरू होणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.