‘मॉक मीट’ करणार शाहकाऱ्यांची गरज पूर्ण; आयआयटी दिल्ली संशोधन सुरू

आयआयटी दिल्लीच्या ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्राने शाकाहारींसाठी मांसाहार तयार केला आहे. त्याला ‘मॉक मीट’ म्हटले जात आहे. मागील दोन वर्षांपासून आयआयटी दिल्लीच्या प्रा. काव्या दशारा आणि त्यांची टीम पोषक आणि सुरक्षित प्रोटीन उत्पादनांवर काम करत आहे.

आरोग्याच्या तक्रारीदूर करण्यासाठी अनेकदा डॉक्टर लोकांना मांसाहार करण्याचा सल्ला देतात. मात्र अनेक लोकांच्या घरी मात्र मांस, मासे व अंडी खाणे वर्ज असते. यासगळ्यावर तोडगा काढत आता आयआयटी दिल्लीने वनस्पतींवर आधारित मांस आणि मासे तयार केले आहेत. वनस्पतीपासून बनवण्यात आलेलं मांस आता शाहकारी लोकही खाऊ शकतात. याचे वैशिष्ट्ये म्हणजे चव, गंध आणि पौष्टिकता अगदी मांसाहारासारखीच असेल.

आयआयटी दिल्लीच्या ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्राने शाकाहारींसाठी मांसाहार तयार केला आहे. त्याला ‘मॉक मीट’ म्हटले जात आहे. मागील दोन वर्षांपासून आयआयटी दिल्लीच्या प्रा. काव्या दशारा आणि त्यांची टीम पोषक आणि सुरक्षित प्रोटीन उत्पादनांवर काम करत आहे. याआधी प्रा. काव्या यांना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या वतीने ‘मॉक एग’ च्या संशोधनासाठी पुरस्कारही मिळाला आहे. या उत्पादनासाठी संयुक्त राष्ट्राच्या टीमने आयआयटी दिल्लीला भेट देत शाकाहारी अंडे शिजवून पाहिले. प्रा. काव्या सांगतात की, मांसातील प्रोटीन डाळींच्या प्रोटीनपेक्षा चांगले असले तरी ते तयार करण्यासाठी सध्या हार्मेन आदींचा वापर होत आहे, जे सुरक्षित नाही. काही अन्नातील प्रोटीन मांसातील प्रोटीनसारखेच असल्याचे त्यांना संशोधनात आढळून आले. अस्सल बंगाली खवय्येही ओळखू शकले नाहीत नकली मासे या वनस्पती आधारित मांस, माशांच्या चाचणीसाठी काव्या यांनी रोज मासे खाणाऱया बंगाल व ईशान्येकडील लोकांना बोलावले होते ही ब्लाईंड डेस्ट होती. त्यांनी ती मासळी असल्याचेच सांगितले. सर्वांनी ती आवडीने खाल्ली व ती मासळी खरी नसल्याचे कुणालाच ओळखता आले नाही. विशेष म्हणजे या मॉक मासळीपासून ओमेग्रा थ्रीची गरजही पूर्ण होईल. बर्गर, बन आणि रोलमध्येही नकली मांसाचा वापर करण्यात आला. आता फूड इंडस्ट्रीच्या मानकाप्रमाणे हे पदार्थ तयार करण्यात येणार आहेत