स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवीन प्लॅन, जाणून घ्या

 सरकारने सबसिडीच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली आहे. परंतु अजूनपर्यंत योजना बनवलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडे 2 पर्याय आहेत. पहिला विना सबसिडीचा सिलेंडर पुरवठा करणे. दुसरा, काही ग्राहकांना सबसिडीचा लाभ देणे.

    नवी दिल्ली: स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या सबसिडी (LPG cylinder Subsidy) बाबत मोठी माहिती समोर येत आहे.  एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलेंडर 1,000 रुपये भरावे लागू शकतात. मात्र, यावर सरकारचा विचार काय आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

    सरकारने सबसिडीच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा केली आहे. परंतु अजूनपर्यंत योजना बनवलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडे 2 पर्याय आहेत. पहिला विना सबसिडीचा सिलेंडर पुरवठा करणे. दुसरा, काही ग्राहकांना सबसिडीचा लाभ देणे.

    जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लान?

    सबसिडी देण्याबाबत सरकारकडून काहीही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. रिपोर्टनुसार, अजूनपर्यंत 10 लाख रुपये इन्कमचा नियम लागू ठेवला जाईल आणि उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Scheme) लाभार्थ्यांना सबसिडीचा लाभ मिळेल. इतरांसाठी सबसिडी रद्द केली जाऊ शकते.