तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच बघतो ! शिवसेना खासदारांनी धमकी दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, शिवसेनेने आरोप फेटाळले

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर आपल्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत हे लॉबीत भेटले आणि त्यांनी आपल्याला धमकावलं, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांनी सावंतांची तक्रार केलीय. तू महाराष्ट्रात कशी फिरतेस, तेच पाहतो. तुलासुद्धा तुरुंगात टाकतो, अशी धमकी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी केलीय. 

    प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापाशी स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा मुद्दा असो किंवा सचिन वाझे प्रकरण असो, महाराष्ट्रातील कायदा सुव्यस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत, असा मुद्दा संसदेत मांडल्यानंतर आपल्याला उघडपणे धमक्या मिळू लागल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता.

    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्यानंतर आपल्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत हे लॉबीत भेटले आणि त्यांनी आपल्याला धमकावलं, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांनी सावंतांची तक्रार केलीय. तू महाराष्ट्रात कशी फिरतेस, तेच पाहतो. तुलासुद्धा तुरुंगात टाकतो, अशी धमकी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी केलीय.

    आपल्या पत्रात राणा यांनी लिहिलंय, महाराष्ट्रातील मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेलं पत्र याबाबत चर्चा सुरू आहे. हेच मुद्दे मी संसदेत उपस्थित केले. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत मला धमकी दिली. यापूर्वीदेखील मला शिवसेनेनं त्यांच्या लेटरहेडवरून जीवे मारण्याच्या आणि चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याच्या धमक्या दिल्या आहेत. या प्रकरणी पोलीस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यांनी केलीय.

    नवनीत राणांचे आरोप खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावलेत. शिवसेना महिलांशी अशा भाषेत कधीच बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. खासदार राणा जे आरोप करतायत, ते धादांत खोटे असल्याचा दावा त्यांनी केलाय. संसद ही काही सुनसान जागा नाही, मी असं बोलल्याचं किंवा धमकावल्याचं कुणी ना कुणी ऐकलं असेलच. त्यांनी एक तरी पुरावा द्यावा, असं त्यांनी म्हटलंय. खासदार राणा यांची भाषा योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.