मोदी सरकारविरोधात देशव्यापी भारत बंद! बँक कर्मचारी युनियनसह कामगारसंघटना, विरोधकांचा पाठिंबा; शिवसेनेची भुमिका गुलदस्त्यात

हा बंद सकाळी ६ ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार असून त्या दरम्यान सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये बंद असतील. तसेच शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. राज्यात सत्ताधारी कॉग्रेस राष्ट्रवादीने संपाला पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेची या बाबतची भुमिका गुलदस्त्यात आहे.

    नवी दिल्ली : गेल्या बारा महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी सोमवारी देशभरात भारत बंद(Bharat Bandh) आंदोलन पुकारण्यात आला आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी बँक युनियनसह सर्व कामगार संघटनानी तसेच विरोधी पक्षांनी संपाचा नारा दिला आहे.

    हा बंद सकाळी ६ ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार असून त्या दरम्यान सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये बंद असतील. तसेच शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सार्वजनिक कार्यक्रम बंद राहणार आहेत. राज्यात सत्ताधारी कॉग्रेस राष्ट्रवादीने संपाला पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेची या बाबतची भुमिका गुलदस्त्यात आहे.

    राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर तीन शेतकरी कायदे अस्तित्वात आले. यानंतर दिल्लीच्या वेशीवर मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र जमले होते. या आंदोलनाच्या पहिल्या वर्षपूर्ती निमित्त संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला राजकीय पक्षांसह समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा मिळाला आहे.

    पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी बंदला पाठिंबा दिला आहे. तर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी देशव्यापी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू सरकारनेही देशव्यापी संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोमवारी निदर्शनांमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र आघाडी सरकारमधील शिवसेनेकडून या संपाला पाठिंबा अद्याप स्पष्ट करण्यात आला नाही.