नवनीत राणांची ‘सर्वोच्च’ धाव; शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी दाखल केली होती याचिका

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासंबंधी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आपली खासदारकी वाचविण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

    दिल्ली : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासंबंधी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आपली खासदारकी वाचविण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

    जात प्रमाणपत्र अवैध ठरवत हायकोर्टाने राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला होता.

    हे सुद्धा वाचा