Netizens hit Zuckerberg, farmers' Facebook page resumed

शेतकरी आंदोलक किसान एकता मोर्चा या फेसबुक पेजवरुन शेतकरी आंदोलनाशी संबंधित माहिती पुरवत होते. तर आंदोलनाची दिशा आणि रणनिती या पेजद्वारे सर्व पाठिंबा देणाऱ्यांना कळविण्यात येत होती. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज सुरु केल्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे.

दिल्ली : दिल्लीत मागील २५ दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या कायद्यांना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाला आज २६ वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशातून तसेच विदेशातून सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलकांनी फेसबुकवर (Zuckerberg) सुरु केलेले किसान एकता पेज फेसबूक (Facebook ) कंपनीकडून बंद करण्यात आले होते. परंतु नेटीझन्सने (Netizens ) केलेल्या विरोधानंतर आणि ट्रोलिंगनंतर शेतकरी आंदोलकांचे पेज ( Farmer’s Facebook page ) पुन्हा सुरु केले आहे.

शेतकरी आंदोलक किसान एकता मोर्चा या फेसबुक पेजवरुन शेतकरी आंदोलनाशी संबंधित माहिती पुरवत होते. तर आंदोलनाची दिशा आणि रणनिती या पेजद्वारे सर्व पाठिंबा देणाऱ्यांना कळविण्यात येत होती. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज सुरु केल्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. फेसबुकने म्हटले आहे की, पुन्हा एकदा ‘किसान एकता मोर्चा’ अॅक्टिव्ह केले आहे. तर फेसबुकच्या प्रवक्त्याने असेही सांगितले की, ‘किसान एकता मोर्चा’ ॲक्टिव्ह केले असून शेतकऱ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.

फेसबुकने कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेशनचे कारण देत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेले किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज बंद केले होते. फेसबुकच्या या निर्णयावर शेतकऱी आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्या नेटकऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फेसबुकला सोशल मिडियाच्या माध्यमातून चांगलेच फैलावर घेतले होते. नेटिझन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता.

ट्विटरवर नेटिझन्सने फेसबुकला ट्रोल केले. यामुळे ट्विटरवर सोमवार सकाळपासूनच #zukerbergshameonyou आणि #FacebookShameonyou हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्गविरुद्ध रोष पाहायला मिळाला आहे. फेसबुकने शेतकरी आंदोलकांचे पेज बंद केल्यामुळे मार्क झुकेरबर्ग हा भाजपचा समर्थक असल्याचे काही जणांनी म्हटले आहे. तर मार्क झुकरबर्ग भाजपाच्या बाजुने काम करत असल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे.