पंजाबातच नाही तर अन्य पाच राज्यातही काँग्रेसचे अंतर्गत गटबाजीने नुकसान, येत्या २ वर्षांत १६ राज्यांत निवडणुका, ५०० हून अधिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पदे रिक्तच

ज्या राज्यांत अगामी २४ महिन्यांत निवडणुका आहेत, त्यापैकी १० राज्यांत काँग्रेसने अद्यापही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. पाच हजारांच्यावर पदाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

  नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसमध्ये (panjab congress)विधानसभा निवडणुकांच्या पाच महिन्यांपूर्वी गटबाजी टोकाला पोहचलेली आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Congress State President Navjyot Singh Sidhu)यांच्या गटातील ४० आमदारांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री कॅप्टनम अमरिंदर सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आता पक्षश्रेष्ठींनी अमरिंदरसिंग यांचा राजीनामा मागितला आहे.

  काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असलेला पंजाब हा एकटाच प्रांत नाही. येत्या दोन वर्षांत १६ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातील प्रमुख पाच राज्यांत काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागलेले आहे. यात पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थान ही अशी राज्ये आहेत, जिथे काँग्रेसची सत्ता आहे. ज्या राज्यांत अगामी २४ महिन्यांत निवडणुका आहेत, त्यापैकी १० राज्यांत काँग्रेसने अद्यापही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही. पाच हजारांच्यावर पदाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाचे एकही पद रिक्त नाही. यातील प्रमुख पाच राज्यांवर एक नजर टाकूयात.

  १.पंजाब- विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२२मध्ये आहेत. काँग्रेसची २०८ सदस्यांची सर्वात मोठी टीम, भाजपाचे २९ पदाधिकारी होते, आता नव्या २०० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचा दावा केला. गेल्या विधानसभा निवडमुकीत ११७ पैकी ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत २०८ सदस्य आहेत. मात्र त्यात दोन गट आहेत. एक गट मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आहे, तर दुसरा गट प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचा आहे. सिद्धू गटातील ४०आमदार कॅप्टनवर नाराज आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपाने ११७ पैकी २३ जागांवर निवडणूक लढवली होती, त्यातील ३ ठिकाणी विजय मिळवला होता. तरीही पक्षातील २९ पदाधिकाऱ्यांची पदे भरलेली आहेत. नव्याने २०० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचा दावा पक्षाने केला आहे. हे सर्व पदाधिकारी ग्राऊंडवर कताम करतायेत, त्यांची माहिती अद्याप जनतेला नसल्याचेही सांगण्यात येते आहे.

  २.राजस्थान – विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२३ साली, जमिनीवर काम करणारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समिती बरखास्त करण्यात आल्या आहेत.तर भाजपा याठिकाणी सर्वाधिक मेहतन घेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करणाऱ्या काँग्रेसची परिस्थिती चांगली नाही. सचिन पायलट यांनी केलेल्या बंडानंतर, १४ जुलै २०२० रोजी सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. यात सर्व प्रकोष्ट, विभाग, ३९ जिल्हाध्यक्ष, ४०० ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा , ब्लॉक कार्यकारिणी यांचा समावेश आहे. तेव्हापासून केवळ ३९ पदाधिकाऱ्यांच्या जोरावर काँग्रेसचे राज्यात काम सुरु आहे. दुसरीकडे भाजपाची विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. २६ मुख्य पदाधिकारी, ९३ प्रदेश कार्यसमिती सदस्य, ५० विशेष आमत्रित, म्हणजे सुमारे १७० जणांची मोठी टीम भाजपाकडे आहे. याव्यतिरिक्त नुकतेच जिल्हा, मंडळ, मोर्चे आणि प्रकोष्ठ यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

  ३.मध्य प्रदेश- विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२३ साली, काँग्रेसने २०१८ साली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. भाजपाची सर्व पदे भरलेली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मात देणारी आणि नंतर बंडखोरीमुळे सरकार गमावलेली काँग्रेस बॅकफूटवर आहे. गेल्या वेळी ७ जुलै २०१८ रोजी राहुल गांधी यांनी ८४ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र त्यानंदर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्यानंतर अनेक पदाधिकारी भाजपात गेले आहेत. पदाधिकाऱ्यांबाबत प्रदेश काँग्रेस कोणतेही उत्तर देत नाहीये. दुसरीकडे भाजपाकडे ५९ मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत १८० जणांची टीम आहे, त्यांचे नाव, पत्ते, मोबाईल नंबर वेबसाईटवर आहेत.

  ४.गुजरात- विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२२ मध्ये. काँग्रेसचे केवळ ३ कार्यकारी अध्यक्ष, भाजपाने मुख्यमंत्र्यांसमवेत पूर्ण मंत्रिमंडळ बदलले, १६० पदाधिकाऱ्यांची टीम गेल्या विधानसभा निवडमुकीत भाजपाने ९९ तर काँग्रेसने ७७ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या १२ आमदारांनी राजीनामा दिला. भाजपाजवळ आत्ता ११५ आमदारांचे संख्याबळ आहे. गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेसचे प्रदेशस्तरावरील संघटन कमकुवत झालेले आहे. स्थानिक नेते काँग्रेस हायकमांडच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या काँग्रेसचे तीन कार्यकारी अध्यक्ष आहेत. हेच पार्टी चालवित आहेत. काही वर्षांपूर्वी येथे २३४ पदाधिकाऱ्यांची टीम होती. दुसरीकडे भाजपाने सत्तेतील भाकरी फिरवली आहे. भूपेंद्र पटेल या नव्या दमाच्या मुख्यमंत्र्यांकडे राज्याची कमान सोपवली आहे. संघटनात्मक पातळीवर राज्यात १६० पदाधिकाऱ्यांची मुख्य कार्यकारिणी आहे. यासह जिल्हा आणि मंडळ स्तरावर १०० पदाधिकारी नियुक्त आहेत.

  ५.छत्तीसगड – विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२३ साली, काँग्रेस आणि भाजपाकडे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत, मात्र काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची ४० जणांची कार्यकारिणी आहे. सर्व नियुक्त्या २०२० मध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेनंतर भूपेश बघेल आणि टीएस सिंह देव यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. तेव्हा या प्रकरणावर पडदा पडला. अजूनही धुसफूस सुरु आहे. दुसरीकडे भाजपाची ८१ जणांची कार्यकारिणी आहे. दोन्ही बांजूंनी निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. गेल्या निवडणुकीत एकूम ९० जागांपैकी काँग्रेसने ६७ तर भाजपाने १५ जागा जिंकल्या होत्या.