Now voting card will be linked with Aadhar card; Election Reform Bill passed in Lok Sabha

देशभरातील मतदारांचे मतदान कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक केले जाणार असून त्या संदर्भातील विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केले. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला(Now voting card will be linked with Aadhar card; Election Reform Bill passed in Lok Sabha).

  दिल्ली : देशभरातील मतदारांचे मतदान कार्ड आता आधार कार्डसोबत लिंक केले जाणार असून त्या संदर्भातील विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केले. यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला(Now voting card will be linked with Aadhar card; Election Reform Bill passed in Lok Sabha).

  या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, १९५० आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ मध्ये बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

  विरोधकांचा गदारोळ

  या विधेयकाला तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दर्शविला. या विधेयकामुळे निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक बदल घडून येईल, असे सांगितले जात आहे. मात्र, विरोधकांनी हा प्रकार नागरिकत्वाशी संबंधित होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. सध्या आधार आणि मतदार कार्ड जोडणी ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे मतदाराची एक स्वतंत्र्य ओळख निर्माण होणार आहे.

  सरकारी बैठकीकडे विरोधकांची पाठ

  केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस, टीएमसी, सीपीआय(एम), सीपीआय आणि शिवसेनेच्या ज्या खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले होते अशा नेत्यांना पत्र लिहून सोमवारी सकाळी 10 वाजता संसदेत बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, केवळ चार पक्षांना बोलावण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला. सोमवारी सकाळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली आणि सरकारने बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला.

  राज्यसभेच्या १२ खासदारांच्या निलंबनावरून सरकारने चार विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. हा विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा कट आहे. या मुद्यावर सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणी खर्गे यांनी केली.