Nursery Admission Canceled This Year Due to Rising Corona Situation nrsj

कोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अ‍ॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे.

दिल्ली : कोरोनामुळे गेल्या १० महिन्यांपासू देशातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोना संकटाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी देशातील सर्व विद्यार्थ्यांचे शिकवणी ऑनलाईन माध्यमातून सुरु आहे. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्ष ऑनलाईन शिक्षणात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिल्ली सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत असून यावर्षी दिल्लीमध्ये नर्सरी अ‍ॅडमिशन (Nursery Admission) रद्द होण्याची शक्यता आहे.

जुलै अगोदर शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी म्हटलं होतं. तसेच कोरोनाची प्रकरणे अशीच वाढत राहिली तर शाळा सुरु करता येणार नाहीत. दिल्ली सरकार यावर विचार करत असून लवकरच खासगी शाळांनाही हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

यावर्षी जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे. त्यामुळं यावर्षी त्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. म्हणून अ‍ॅडमिशन न करण्याचा पर्याय विचारात असून सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. या विषयी बोलताना सिसोदिया यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संकटात न टाकता शाळा सुरु करणे आणि परीक्षा घेणे हे आमचे लक्ष्य असल्याचे म्हटले.

कोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अ‍ॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच दिल्लीत प्रदुषणाच्या पातळीतही दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या समस्या आणखीच वाढताना दिसत आहेत.