On Raising Marriage Age for Girls To 21: मुलींचे लग्नाचे वय 21 करण्याच्या निर्णयमुळे घाई-गडबड; एका आठवड्यात झाले 450 विवाह

देशात मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे निश्चित केले जाणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण ग्रामीण भारतापर्यंत ही बातमी गेली आहे. आगीप्रमाणे पसरणाऱ्या या माहितीमुळे हरियाणाच्या मेवातमध्ये एका आठवड्यात 18 ते 21 वयोगटातील मुलींची सुमारे 450 विवाह पार पाडण्यात आले( On Raising Marriage Age for Girls To 21 age 450 marriages took place in one week).

  दिल्ली : देशात मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे निश्चित केले जाणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण ग्रामीण भारतापर्यंत ही बातमी गेली आहे. आगीप्रमाणे पसरणाऱ्या या माहितीमुळे हरियाणाच्या मेवातमध्ये एका आठवड्यात 18 ते 21 वयोगटातील मुलींची सुमारे 450 विवाह पार पाडण्यात आले( On Raising Marriage Age for Girls To 21 age 450 marriages took place in one week).

  या आठवड्यात केवळ 180 लग्नं नियोजित होती. गुरुवारी सरकारच्या घोषणेपासून कोर्ट मॅरेजलाही वेग आला आहे, असे दोन स्थानिक वकिलांनी सांगितले. गुरुग्राममध्ये कोर्ट मॅरेज करणाऱ्या आंतरजातीय जोडप्यांची संख्या आठवडाअखेर 4 पट वाढली आहे. गुरुग्रामबद्दल बोलायचे झाल्यास, एका अहवालानुसार, न्यायालयात 20 विवाहांसाठी अर्ज आले होते. सामान्यपणे फक्त 6 किंवा 7 अर्ज विवाहासाठी येतात. मंदिरांमध्ये सुमारे 55 विवाह झाले, जे फक्त 5 किंवा 7 असतात.

  निर्णयामुळे अनेक अस्वस्थ

  ही कथा केवळ एका मुलीची नाही कारण सरकारने महिलांसाठी लग्नाचे वय वाढविण्याच्या विधेयकाला मंजुरी दिल्याने मुस्लिमबहुल मेवात प्रदेशात विशेषत: नूह जिल्ह्यात जिथे मुलींची लग्न लवकर केले जाते, तिथे अनेकांना अस्वस्थ केले आहे. नूह हा देशातील सर्वात मागासलेला जिल्हा आहे. या प्रदेशात 18 ते 20 वयोगटातील मुलींसाठी आठवड्याच्या शेवटी शेकडो विवाह झाले, जेथे पालकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. कारण अद्यापही असे करणे हे कायदेशीर होते.

  नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

  नूहचे एक इमाम इमाम मुश्ताक यांनी सांगितले की, मला अशा नवरदेवांचे मोठ्या संख्येने प्रस्ताव येत आहेत जे दोन दिवसांत लग्न करण्यास तयार आहेत. अशी मुले गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. गंमत म्हणजे, नूहच्या मुलींनी लग्नाचे वय वाढविण्याची मागणी करणाऱ्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. हरियाणात लग्नाचे वय वाढविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करणारे सुनील जगलान म्हणाले की, पालक आपल्या मुलींच्या लग्नासाठी घाई करताना दिसत आहेत, त्यामुळे कायदा होईपर्यंत अशा विवाहांची नोंदणी थांबवावी अशी आमची इच्छा आहे.

  विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीच्या वेदना

  फिरोजपूर झिरका येथील मुस्लिम कुटुंबातील एका मुलीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मी पाच वर्षांची असताना मला माहीत होते की माझा नवरा कोण असेल. तो माझ्या मावशीचा नातेवाईक आहे. मी तुलनेने अधिक उदारमतवादी आणि शिक्षित कुटुंबातून आले आहे आणि दिल्ली विद्यापीठात जाणारी माझ्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे. मला वसतिगृहात राहण्याची परवानगी होती आणि लग्नाबद्दल कधीच बोलले गेले नाही.

  मात्र, अलीकडे मी माझ्या आईसोबत खरेदीसाठी बाहेर पडलो असता, माझ्या वडिलांनी हाक मारली आणि अचानक आईने सलवार-कमीज बाजूला ठेवला आणि वधूच्या माळा शोधायला सुरुवात केली. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की महिलांचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्यासाठी नवीन कायदा केला जात आहे. मुलगा आणि त्याचे कुटुंब आणखी 3 वर्षे थांबणार नाही या भीतीने माझ्या कुटुंबाला लवकर लग्न करायचे होते. लग्न आता या आठवड्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

  लग्नाचे वय कधी बदलले?

  विशेष म्हणजे, केंद्र सरकारने देशातील सामाजिक सुधारणेशी संबंधित एक मोठे पाऊल उचलले आहे. देशात लग्नाच्या वयात 43 वर्षांनी बदल करण्यात येत आहे, याआधी 1978 मध्ये हा बदल करण्यात आला होता. त्यानंतर 1929 च्या शारदा कायद्यात सुधारणा करून लग्नाचे वय 15 वरून 18 वर्षे करण्यात आले.  आता केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींचे लग्नाचे किमान वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.