
डॉलर स्थिरावल्यानंतर सोने आणि चांदीचे दर स्थिर होतील. भारतामध्ये आगामी काळामध्ये बरेच सण येणार आहेत. त्यामुळे भारतामध्ये खरेदी वाढण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली – दिल्ली सराफात सोन्याचा दर 66 रुपयांनी कमी होऊन 46,309 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 332 रुपयांनी वाढून 67, 248 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,782 डॉलर तर चांदीचा दर 26.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. सध्या डॉलरचा भाव अस्थिर असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारात अस्थिर आहेत. त्यामुळे आज भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले तर चांदीचा दर वाढला.
एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर स्थिरावल्यानंतर सोने आणि चांदीचे दर स्थिर होतील. भारतामध्ये आगामी काळामध्ये बरेच सण येणार आहेत. त्यामुळे भारतामध्ये खरेदी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता 47 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली होती. त्यानंतर सातत्याने सोन्याचे दर 100 ते 200 रुपयांनी कमी अधिक राहिले आहेत. जळगाव सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर प्रति तोळ्याला जीएसटीशिवाय 47 हजार रुपये तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 400 रुपये प्रतितोळा असे नोंदवण्यात आले.