Oppo चा नवा बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत अन् फिचर्स? जाणून घ्या !

सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.

दिल्ली (Delhi).  सध्या सर्वच स्मार्टफोन कंपन्या आपले 5G स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. आता Oppo ने आपला A53 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन Oppo A53 चाच 5G वर्जन आहे. कंपनीने हा फोन 2 रॅम आणि 3 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. सध्या Oppo ने आपला हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. लवकरच हा बजेट 5G फोन भारतातही लॉन्च केला जाणार आहे.

Oppo A53 5G च्या 4GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत जवळपास 14,600 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच याच्या 6GB + 128GB असणाऱ्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. युजर्सना हा फोन ग्रीन, सीक्रेट नाईट ब्लॅक आणि स्ट्रीमर पर्पल ऑप्शनसोबत खरेदी करता येणार आहे.