देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहे किंमती?

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशात 20-22 पैशांनी पेट्रोल महाग (Petrol Price hike) झाले आहे. तर डिझेलमध्ये आज थेट 25 पैशांची वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरस (Corona Virus) महामारी तर दुसरीकडे, सामान्य माणसाला महागाईपासून सुटका मिळत नाहीये. या भागात पुन्हा एकदा तेलाच्या (Price of petrol & diesel ) वाढत्या किमतींमुळे लोकांची चिंता वाढली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देशात 20-22 पैशांनी पेट्रोल महाग (Petrol Price hike) झाले आहे. तर डिझेलमध्ये आज थेट 25 पैशांची वाढ झाली आहे.

    जवळपास दोन महिन्यांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. यापूर्वी तेल वितरण कंपन्यांनी 24, 26 आणि 27 सप्टेंबर रोजी डिझेलच्या (Diesel) किंमती वाढवल्या होत्या. तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत पेट्रोल 101.39 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.57 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध होत आहे.

    त्याचबरोबर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे. तर डिझेल 97.21 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 101.87 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.67 रुपये प्रति लीटर उपलब्ध आहे. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर येथे पेट्रोल 99.15 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लिटर उपलब्ध आहे.