आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर?

राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.64 रुपयापर्यंत पोहोचला आहे तर डिझेलचा दर 89.91 रुपयांवर गेला आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 107.71 रुपये इतका आहे.

    नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कच्चे तेल स्वस्त होऊन देखील भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.64 रुपयापर्यंत पोहोचला आहे तर डिझेलचा दर 89.91 रुपयांवर गेला आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर 107.71 रुपये इतका आहे.

    तज्ज्ञांच्या मतानुसार आतंरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी होणे हा चांगला संकेत आहे. मात्र, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा ग्राहकांना फायदा मिळत नाही.

    पेट्रोल-डिझेलचे नवीन दर काय ?

    मुंबईत पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 97.52 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीत पेट्रोल 101.64 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर आहे. तसेच चेन्नई पेट्रोल 99.36 रुपये आणि डिझेल 94.45 रुपये प्रति लीटर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात.