पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? जनतेला खुश करण्यासाठी मोदी सरकारचा मास्टरप्लान

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. काही शहरांत पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. तर अनेक शहरांत थोड्याच दिवसांत पेट्रोल शंभरी ओलांडेल, अशी शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलवरील करांमधून सरकारला मोठा महसूल मिळतो. मात्र, कोरोनामुळे मोठा महसुल बुडाल्याने केंद्र आणि राज्य सरकारं इंधनावरील कर कमी करण्यास तयार नाहीत. या कराचा बोजा सर्वसामान्यांवर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार अनेक पर्यायांची चापपणी करत आहे.

    दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मा, लवकरच सर्वसमान्यांची या टेन्शनमधिन सुटका होणार आहे. पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने एक मास्टरप्लान बनवला आहे. यामुळे पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार आहे.

    मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला आहे. काही शहरांत पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. तर अनेक शहरांत थोड्याच दिवसांत पेट्रोल शंभरी ओलांडेल, अशी शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलवरील करांमधून सरकारला मोठा महसूल मिळतो. मात्र, कोरोनामुळे मोठा महसुल बुडाल्याने केंद्र आणि राज्य सरकारं इंधनावरील कर कमी करण्यास तयार नाहीत. या कराचा बोजा सर्वसामान्यांवर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार अनेक पर्यायांची चापपणी करत आहे.

    भारत आपल्या दैनंदिन गरजेच्या ८४-८५ टक्के इंधन आयात करतो. यापैकी ६० टक्के इंधन आखाती देशांमधून मागवलं जातं. या देशांनी इंधनाचं उत्पादन कमी केल्यानं दरांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मोदी सरकारनं पर्यायी रणनीती आखली आहे.

    इंधनाची आयात करताना विविधीकरणाचा विचार करा, असा सल्ला केंद्रानं तेल शुद्धीकरण कंपन्यांना दिला आहे. भारतानं इंधन खरेदीच्या करारासाठी गयाना आणि मेक्सिकोसोबत बातचीत सुरू केली आहे.