इंधनाचा भडका सुरूच! राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९८ रुपये तर मुंबईत शंभरी पार…

४ मे पासून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. रोज थोड्या-थोड्या फरकाने होणाऱ्या वाढीमुळे अनेक शहरात पेट्रोलचे दर १०० च्या पार तर काही शहरात १०५ रुपयांपेक्षा जास्त आहेत.

  नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude oil price) सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत आज २९ पैशांची वाढ केली आहे तर डिझेलचे दर २४  पैसे प्रति लीटरने वाढले आहेत. या वाढीनंतर मुंबईतील पेट्रोलचे दर १०४.९० रुपये आणि डिझेलचे दर ९६.७२ रुपये प्रति लीटर झाले आहेत.

  ४ मे पासून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. रोज थोड्या-थोड्या फरकाने होणाऱ्या वाढीमुळे अनेक शहरात पेट्रोलचे दर १०० च्या पार तर काही शहरात १०५ रुपयांपेक्षा जास्त आहेत.

  चार प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर :

  दिल्ली – पेट्रोल ९८.८१ रुपये आणि डिझेल ८९.९१ रुपये प्रति लीटर

  मुंबई – पेट्रोल १०४.९० रुपये आणि डिझेल ९६.७२ रुपये प्रति लीटर

  चेन्नई – पेट्रोल ९९.८० रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लीटर

  कोलकाता – पेट्रोल ९८.६४ रुपये आणि डिझेल ९२.०३ रुपये प्रति लीटर