पीएम किसान योजना: आता डबल पैसे मिळणार; दोन हजारऐवजी चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी (Indian Farmers) पीएम किसान (pm kisan yojana) योजना सुरू केली. या योजनेचा शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा होणार आहे. कारण आता शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत. दोन हजारऐवजी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

  नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी (Indian Farmers) पीएम किसान (pm kisan yojana) योजना सुरू केली. या योजनेचा शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा होणार आहे. कारण आता शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत. दोन हजारऐवजी चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

  या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाणारी रक्कम दुप्पट करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. हा निर्णय झाल्यास या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना बँक खात्यात 2000 रुपयांच्या हप्त्याऐवजी 4000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.

  पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. आतापर्यंत मोदी सरकारने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये जमा केले आहेत.

  दरम्यान, केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता.

  या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असूनही आधीचा हप्ता मिळाला नसेल तर शेतकरी अजूनही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासह आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळू शकते. यामुळे पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोनच्या ऐवजी चार हजार रुपये जमा होतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.

  पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करायची आहे. तुमचा अर्ज स्विकार झाल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.

  मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.