शेतकऱ्यांशी संवाद (LIVE) | कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवू नका, पंतप्रधानांचं आवाहन, नवे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट2 years ago

कृषी कायद्यांबाबत गैरसमज पसरवू नका, पंतप्रधानांचं आवाहन, नवे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
13:44 PMDec 25, 2020

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रयोग डेअरी इंडस्ट्रीतही - मोदी

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल हा भ्रम असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. दूध डेअरीच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टचा प्रकार पूर्वीपासून सुरू आहे. मात्र व्यावसायिकांनी डेअऱ्यांवर अतिक्रमण येण्याचं एक तरी उदाहरण आहे का, असा सवाल त्यांनी केलाय.

13:31 PMDec 25, 2020

शेतकऱ्यांचा फायदा झाला, तर बिघडलं कुठे? - मोदी

नवे कायदे शेतकऱ्यांना जिथं अधिक दर मिळेल, तिथं आपला माल विकण्याची मुभा देतात. शेतकऱ्यांना जर ही मुभा मिळत असेल, तर त्यात काय बिघडलं, असा सवाल पंतप्रधान मोदींची विचारला.

13:29 PMDec 25, 2020

कृषी कायद्यांना विरोध कऱणारे बंगाल, केरळबाबत का बोलत नाहीत?

कृषी कायद्यांना विरोध करणारे पश्चिम बंगाल आणि केरळबाबत का बोलत नाहीत, असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केलाय. या राज्यांमध्ये एपीएमसी नाहीत, मग तिथले शेतकरी का आंदोलन करत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

13:26 PMDec 25, 2020

ममता बॅनर्जींवर थेट निशाणा, विरोधकांना सवाल

किसान सन्मान योजनेत निधी हस्तांतरीत करण्याच्या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर थेट निशाणा साधलाय. ममता बॅनर्जींच्या चुकीच्या धोरणांमुळेच बंगालमधील शेतकरी हे केंद्र सरकारच्या योजनांपासून दूर राहत असल्याचं त्यांनी म्हटलंय. या गोष्टीचं आपल्याला दुःख होत असून त्याबाबत विरोधक का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

13:20 PMDec 25, 2020

बंगालमधील शेतकऱ्यांना योजनेचा फायदा नाही

पश्चिम बंगाल सरकारच्या धोरणांमुळे या राज्यातील गोरगरीब शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नसल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं हे विधान महत्त्वाचं मानलं जातंय.

13:17 PMDec 25, 2020

पंतप्रधान म्हणतात, ना मध्यस्थ, ना कमिशन !

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटींपेक्षा अधिक रुपये जमा कऱण्यात आले असून या प्रक्रियेत एकही मध्यस्थ नाही आणि कुणालाही कमिशन देण्याचा प्रश्न नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

13:13 PMDec 25, 2020

शेतकऱ्यांना ४ टक्के दराने मिळाले कर्ज

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ओडिशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ओडिशातील शेतकरी नवीन यांनी यावेळी आपल्याला २०१९ साली किसान सन्मान क्रेडीट कार्ड मिळाल्याचे सांगितले. तसेच आपल्यााला २७ हजारांचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजदराने मिळाल्याचा अनुभवही त्यांनी कथन केेला.

शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १८ हजार कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी एक बटन दाबून हे पैसे शेतकऱ्यांच्या नावे हस्तांतरीत केले.

Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.