कोरोनाची लस (प्रतिकात्मक फोटो)
कोरोनाची लस (प्रतिकात्मक फोटो)

अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटीश कंपनीला मान्यता देणारा भारत पहिला देश होऊ शकतो. ब्रिटनमध्ये सध्या त्याचा चाचणी डेटा तपासला जात आहे.

नवी दिल्ली.  कोरोना व्हॅक्सीनवर लवकरच चांगले वृत्त येण्याचे आशा आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन कोव्हीडशिल्डच्या भारतात इमरजेंसी वापरासाठी पुढच्या आठवड्यात मंजूरी मिळू शकते. सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून अजून काही डेटा मागवला होता. जो कंपनीने प्रोव्हाइड केला आहे. भारतात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनची मॅन्युफॅक्चरिंग सीरम करत आहे.

अप्रुव्ह करणारा पहिला देश असणार भारत
अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटीश कंपनीला मान्यता देणारा भारत पहिला देश होऊ शकतो. ब्रिटनमध्ये सध्या त्याचा चाचणी डेटा तपासला जात आहे. लस बनवण्यामध्ये भारत जगातील सर्वात मोठा देश आहे. जानेवारीपासून देशातील जनतेला कोरोना लस देण्यास सुरूवात व्हावी अशी सरकारची इच्छा आहे. यासाठी फायझर आणि भारत बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरास लवकरच मान्यता दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी उत्पन्न असणार्‍या देशांसाठी आणि गरम हवामानातील नागरिकांसाठी अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड लस महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण ती लस स्वस्तही आहे. सोबतच लसीचे वाहतुकीकरण करणे सोपे आहे आणि सामान्य फ्रिज तापमानात दीर्घकाळ साठवलीही जाऊ शकते. त्यामुळे या लसीचा भारतीयांना फायदा होईल अशीही माहिती समोर येत आहे.