प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला ; 3 दिवसांमधील दुसरी भेट , राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली.

    नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार यांची आज गेल्या 3 दिवसांमधील दुसरी भेट आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलं आहे.

    शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यावर आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असं शरद पवारांनी सांगितल्याचं वृत्त एका वृत्तवाहीनीने दिलं आहे.