राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती बिघडली, आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

आर्मी रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते आहे. सकाळच्या सुमाराला अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज (शुक्रवारी) त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने त्यांना आर्मी रुग्णालयात हलवण्यात आले.

    आर्मी रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते आहे. सकाळच्या सुमाराला अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

    हे सुद्धा वाचा

    तपासणीनंतर कुठलंही चिंतेचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र सध्याच्या कोरोना काळात अचानक छातीत दुखू लागल्यामुळे कुठलाही वेळ न दवडता राष्ट्रपतींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आणि सर्व चाचण्या करण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे निकाल समाधानकारक असून सध्या तरी चिंतेचं काही कारण दिसत नसल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितल्याची माहिती समजते आहे.