‘या’ दिवशी होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची थेटभेट

पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांची पहिली थेट भेट २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २३सप्टेंबर रोजी अमेरिकेला रवाना होतील. ते क्वॉड कंट्रीज समिट आणि यूएन जनरल असेंब्लीच्या बैठकीला उपस्थित राहतील. सोमवारी व्हाईट हाऊसने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही निश्चित केली. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांची पहिली थेट भेट २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.