हातात फक्त 36 हजारांची रोकड;  पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रॉपर्टी किती आहे माहित का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी मोदी यांची संपत्ती 2.85 कोटी इतकी होती. जी यावर्षी 22 लाखांनी वाढली आहे. मोदी यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना त्यांची संपत्ती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांची संपत्ती 3.07 कोटी इतकी झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी मोदी यांची संपत्ती 2.85 कोटी इतकी होती. जी यावर्षी 22 लाखांनी वाढली आहे. मोदी यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना त्यांची संपत्ती जाहीर करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार पंतप्रधानांनीही आपली संपत्ती जाहीर केली आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळातील बरेच मंत्री हे शेअर बाजारात गुंतवणूक करतात, मात्र मोदींनी शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही. बँका आणि इतर सुरक्षित माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे मोदी यांना आवडतं, ज्यामुळे अर्थव्यवस्था खालावली असली तरी मोदींच्या संपत्तीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मोदी यांनी राष्ट्रीय बचत सर्टिफिकेटमध्ये 8.9 लाखांची, जीवन विमा योजनेत 1.5 लाखांची आणि एल अँड टी इन्फ्रास्टक्चर बाँडमध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. मोदी यांचे गांधीनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असून तिथे 1.86 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात आले आहेत.

    पंतप्रधानांनी कोणतेही कर्ज काढलेले नाही आणि त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नाही. मोदींकडे 45 ग्रॅम वजनाच्या 4 अंगठ्या आहेत ज्यांची किंमत 1.48 लाख रुपये इतकी आहे. 31 मार्च 2021 रोजी त्यांच्या बँक खात्यात 1.5 लाख रुपयांची रक्कम होती. मोदी यांच्याकडे रोकड रक्कम फक्त 36 हजार रुपयांची आहे. 2014 साली पंतप्रधान बनल्यापासून मोदींनी एकही संपत्ती विकत घेतलेली नाही. 2002 साली त्यांनी जागा विकत घेतली होती, ज्याचे मूल्य आजमितीला 1.1 कोटी रुपये इतके आहे.