प्रशासनाच्या आव्हानानंतर आंदोलकांनी रस्त्याची एका बाजू केली खाली

गाजीपूर सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने रस्त्याची एक बाजू नागरिकांना मोकळीकरून दिली आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. तब्बल २६ दिवशीही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी गाजीपूर सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलकांनी सकाळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले होते. मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने रस्त्याची एक बाजू नागरिकांना मोकळीकरून दिली आहे. रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या समितीसोबत
जिल्हा दंडाधिकारी व एसएसपी यांचे बोलणे झाले असल्याची माहिती गाजियाबादचे एडीएम शैलेंद्र कुमार यांनी दिली केली आहे. तसेच दुसऱ्या बाजूचा रस्ता ही सुरू करण्याबाबतही बोलणे सुरू आहे.