Woman accused of molesting a young woman under the Love Jihad Act

  दिल्ली : देशात धर्मांतराचे रॅकेट पसरविणाऱ्या उमर गौतम व जहांगीर यांचे लखनौ कनेक्शन समोर आले आहे. लखनौच्या प्रियांका सेन व चंद्रकला यादव यांचे धर्मांतरदेखील या रॅकेटनेच केले होते. यानंतर आता त्या धर्म बदलून कुटुंबापासून वेगळ्या राहात आहे. यात प्रियांका अलिंगजच्या मेहंदी टोलाची राहणारी आहे, तर चंद्रकलाचा परिवार तेलिबागमध्ये राहतो आहे.

  महिलाबादच्या संस्थेत पदाधिकारी आहे उमर गौतम

  धर्मांतरातील प्रमुख आरोपी मोहम्मद उमर गौतम लखनौ येथील अल हसन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर फाउंडेशमध्ये पदाधिकारी आहेत. एटीएसला संशय आहे की, या संस्थेतून फंडिंग करण्यात आली होती. उमर या संस्थेत उपाध्यक्षाच्या पदावर आहे. अल हसन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर फाउंडेशन लखनौच्या मलिहाबादच्या रहमानखेडामध्ये एक शाळा संचालित करीत आहे. दहावीपर्यंत सीबीएसई बोर्डाच्या या शाळेत 500 विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण देण्याविषयी सांगण्यात येते.

  18 वेळा इंग्लंड, 4 वेळा अमेरिकेला गेला होता उमर

  अवैध धर्मांतराचे कथित नेटवर्क चालविणाऱ्या मोहम्मद उमर गौतमने धर्मपरिवर्तनाच्या कार्यक्रमासाठी 18 वेळा इंग्लंड, 4 वेळा अमेरिका, सिंगापूर, पोलंड व आफ्रिकेच्या अनेक देशांचा प्रवास केला. त्याने परदेशात अनेक लोकांचे धर्मांतर केले हेाते. उमरच्या आलेल्या दोन व्हीडिओमुळे हा खुलासा झाला आहे. दरम्यान, उमर व जहांगीरजवळून जप्त करण्यात आलेल्या दस्तावेजात लखनौच्या अलिगंजच्या मेहंदी टोला व तेलिबागच्या दोन मुलींचे धर्मांतर केल्याविषयीची माहिती समोर आली आहे.

  जैश-ए-मोहम्मदशी संबंध

  उत्तरप्रदेशातील धर्मांतर रॅकेटचा संबंध पाकिस्तानी गुप्त संघटना आयएसआय तसेच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी जोडले जात आहे. जैशने एप्रिलमध्ये पाकिस्तानात एक खास मिशन तयार केले होते. या मिशनचा उद्देश धार्मिक उन्माद पसरविणे होते. याची सुरुवात डासना मंदिरापासून होणार होती, परंतु हे मिशन यशस्वी झाले नाही व सुरक्षा एजन्सींजला याविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर कासिफ व विपुल विजयवर्गी आपली ओळख बदलून डासना मंदिरात पोहोचले होते व तेथे पकडले गेले. विपुल व कासिफ धर्मांतर रॅकेट चालविण्याच्या आरोप अटक झालेल्या दोन मौलवींशी थेट जोडलेले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

  धर्मांतर करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित

  धर्मांतर करवून घेणाऱ्यांमध्ये डॉक्टर, इंजिनीअर व पीएचडी होल्डरदेखील सहभागी असल्याचे इस्लामिक दावा सेंटरशी संबंध ठेवणाऱ्या मोहम्मद उमर गौतम व मुफ्ती जहांगीर कासमीद्वारे गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या धर्मांतराच्या 81 पानांच्या विवरणात समोर आले आहे. मुफ्ती काजी जहांगीर आलम कासमीच्या सहीने 7 जानेवारी 2020 पासून 12 मे 2021 या दरम्यान 33 लोकांचे धर्मांतर करण्यात आले ज्यात 18 महिला व 15 पुरुषांचा समावेश आहे. राज्याविषयी बोलायचे झाले तर सर्वाधिक धर्मांतर दिल्लीतून 14, उत्तरप्रदेशातून 9, बिहारमधून 3, मध्यप्रदेशातून 2 व गुजरात, महाराष्ट्र, आसाम, झारखंड व केरळमधून 1-1 व्यक्तींनी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केला आहे.

  2010 पर्यंत दिल्लीत होते प्रियांकाचे कुटुंब

  प्रियांका मुस्लिम झाल्यानंतर फामिता मोहम्मद फारूक या नावाने ओळखली जात आहे. जहांगीरकडून एटीएसने जे दस्तावेज जप्त केले आहे, त्यात प्रियांकाचा पत्ता 532 केएनए…336 मेहंदी टोला अलिगंज असा लिहिला आहे. प्रियांकाच्या मेहंदी टोला येथील घरात तिची आई माया सेन व भाऊ राहतो. प्रियांका आता कुठे व कोणत्या परिस्थितीत आहे, याविषयी प्रियांकाच्या कुटुंबाला काहीही माहीत नाही. आई माया सेन यांनी सांगितले की, 2010 पर्यंत ते दिल्लीत सोबत राहात होते. त्यानंत ते मुलगा नितीन व मुलगी प्रियांकाबरोबर अलिगंजच्या मेहंदी टोलामध्ये आपल्या वडिलोपार्जित घरी येऊन राहू लागले. प्रियांकाने सॉफ्टवेअरमध्ये डिप्लोमा केला होता.

  चंद्रकलेशी तोडले कुटुंबाने नाते

  तेलिबागच्या राजीव नगर घोसियानामध्ये राहणारी चंद्रकला आता कनीज फातिमा या नावाने ओळखली जाते. चंद्रकला दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. 33 वर्षीय चंद्रकलाने बी फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. ती जयपूरच्या खासगी संस्थेत शिकविण्याचे काम करते. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता तिच्याशी आमचा काहीही संबंध नाही.