कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्याविरोधात राहुल गांधींची श्वेतपत्रिका, मोदी सरकारवर टीका करण्याचा हेतू नाही तर…

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली असल्याचे सांगितले आहे. व्हिसीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी संवाद साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, देशात आणि जगभरात कोरोनाची तिसरी लाट येणार हे निश्चित असल्यामुळे देशात केंद्र सरकारने या लाटेचा सामना करण्यासाठी तयार असावे असा आमचा हेतु आहे. केंद्र सरकावर टीका करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली नसून केवळ दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. कोरोनविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला मदतीचा हात पुढे करत आहोत अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.

    नवी दिल्ली :  देशात २१ जून रोजी झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. तसेच, केवळ एका दिवसांत ८० लाख डोस देऊन काहीही होणार नाही, तर दररोज ८० लाख नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

    काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनावर श्वेतपत्रिका काढली असून पत्रकार परिषदेमध्ये याबाबत विस्तृत माहिती दिली. मोदी सरकारसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील उपाययोजनांसाठीचा अहवाल या श्वेत पत्रिकेमध्ये तयार करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने अगोदरपासूनच तयारीनीशी सज्ज राहायला हवं, असेही राहुल गांधींनी म्हटलं आहे.