हे वाचा … सोनू सूदसह , आणखी कोणत्या ‘कलाकारांनी’ दिलाय शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

देशातील सर्वच लोकांचे लक्ष शेतकरी आंदोलनाकडे आहे. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकार यांनी ट्विट करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

‘किसान है, तो हम है’ असे ट्विट करत अभिनेता सोनु सूदने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.


यापूर्वीही सोनू सुदने आपलया ट्विटरावरून ३ डिसेंबरालाही ‘किसान है हिंदुस्थान’ असे ट्विट करत आपला आंदोलनाला पांठिबा दर्शविला आहे. देशातील सर्वच लोकांचे लक्ष शेतकरी आंदोलनाकडे आहे. यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकार यांनी ट्विट करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी बॉलीवूडमध्ये आपला माणूस म्हणून चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मराठा मोळा कलाकार रितेश देशमुख याने

‘इफ यू इट टुडे , थँक्स अ फार्मर , आय स्टँड इन सॉलिडॅरिटी विथ एव्हरी फार्मर इन अवर कंट्री’ हे ट्विट करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

 

चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही हॅशटॅग आय स्टँड विथ फार्मर असे ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांनी ‘जो बोले सोनिहाल’. असे म्हणत शेतकऱ्यांच्या सोबत उभे असल्याचे सांगितले आहे.

 

बॉलीवूड कलाकार गप्पी गरवाल्याने हॅशटॅग ८ डिसेंबर भारत बंद , टेक बॅक फार्म लॉ , फार्मर्स आर लाईफलाईन’

अशी हॅशटॅग वापरता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय गायक कलाकार दलजितसिंग दोसांज यानेही आंदोलन स्थळावर प्रत्येकक्ष भेट देत शेतकऱ्यांना आंदोलनाला पाठिंबा दिला या आहे.