पळपुट्या विजय मल्ल्या, नीरव मोदीकडून 13 हजार 109 कोटींची वसुली; अर्थमंत्र्यांची लोकसभेत माहिती

देशातील अनेक बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याकडून 13 हजार 109 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या थकबाकीदारांच्या मालमत्ता विकून बँकांनी ही रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली. या वसुलीची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी जुलैमध्येच दिली होती. मात्र, सोमवारी या वसुलीची अधिकृत माहिती अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केली(Recovery of Rs 13,109 crore from fugitive Vijay Mallya, Nirav Modi; Information of Finance Minister in Lok Sabha).

    दिल्ली : देशातील अनेक बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्याकडून 13 हजार 109 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या थकबाकीदारांच्या मालमत्ता विकून बँकांनी ही रक्कम वसूल केली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली. या वसुलीची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी जुलैमध्येच दिली होती. मात्र, सोमवारी या वसुलीची अधिकृत माहिती अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केली(Recovery of Rs 13,109 crore from fugitive Vijay Mallya, Nirav Modi; Information of Finance Minister in Lok Sabha).

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या सात वर्षांत सेटलमेंट आणि इतर उपायांमधून 5.49 लाख कोटी रुपये वसूल केले आहेत. मद्य व्यापारी विजय मल्ल्या 2016 मध्ये देश सोडून ब्रिटनमध्ये गेला होता. विजय मल्ल्या याने आपल्या विमान कंपनीसाठी भारतीय बँकांकडून सुमारे 9000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि ते न फेडता परदेशात पळुन गेल्याचा आरोप आहे. 9000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी सीबीआय आणि ईडी विजय मल्ल्याविरुद्धही तपास करत आहेत.

    प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू

    फरार हिरे व्यापारी नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेकडून बनावट कागदपत्रांद्वारे 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नीरव मोदीची पत्नी एमी मोदी, भाऊ निशाल मोदी आणि मामा मेहुल चोक्सी हे देखील आरोपी आहेत. फसवणुकीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढला आणि अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले. चोक्सी तेथून अचानक बेपत्ता झाल्यानंतर डॉमिनिका पोलिसांनी त्याला अटक केली. फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाबाबत लंडन उच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. या सुनावणीत भारताने आर्थर जेलची स्थिती आणि वैद्यकीय सुविधांबाबत फरार हिरे व्यापाऱ्याने केलेले आरोप फेटाळून लावले होते. भारत सरकारच्या वकिलांनी नीरव मोदीला तुरुंगात चांगली वागणूक मिळेल याची पुष्टी केली होती.