sakshi maharaj

उत्तरप्रदेशच्या उन्नावचे खासदार साक्षी महाराज(Sakshi Maharaj is threatened with a bomb) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

    दिल्ली : उत्तरप्रदेशच्या उन्नावचे खासदार साक्षी महाराज(Sakshi Maharaj is threatened with a bomb) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

    साक्षी महाराजांनीच ही माहिती पोलिसांना दिली आहे. साक्षी महाराजांना शनिवारी अंदाजे दुपारी 4.10 ते 4.20 दरम्यान एका क्रमांकावरून अनेकवेळा फोन आले. फोन उचलल्यानंतर समोरून अतिशय अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली आणि बॉम्बने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

    साक्षी महाराजांच्या म्हणण्यानुसार, धमकी देणाऱ्याने तुमच्या घरच्यांसकट ठार मारू असे म्हटले आहे. साक्षी महाराजांनी याची माहिती पोलिस अधीक्षकांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.

    सोमवारी संध्याकाळी अजीज अहमद नावाच्या एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात धार्मिक द्वेष पसरवणे, जीवे मारण्याची धमकी देणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.