sanjay raut

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला? विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता.” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाराचे आरोप केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, यांना “ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल.” पाटील यांच्या याच वक्तव्याचा संजय राऊत समाचार घेतला आहे.

    दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांना ‘ईडी’चा इतका अनुभव कधीपासून आला? विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला आणि चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता.” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    “कोल्हापूरात राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ यांचं वजन आहे. त्यामुळे कोल्हापुराच भाजपचा सुपडा साफ झाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात.” राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन देण्यात येणाऱ्या धमक्यांवरुन संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्याच बाता मारतात! चंद्रकांतदादा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत याचे भान तरी त्यांनी ठेवावे, पण चंद्रकांतदादांचे वागणे, बोलणे व फुकाचे डोलणे राज्यात कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या मुखातून भाजपची लक्तरेच लोंबत असतात. ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या संस्थांना बदनाम करीत आहेत.” अशी खोचक टीका खासदार राऊत यांनी केली आहे.