संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार; दिल्लीत जोरदार स्वागत

मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. तब्बल १०३ दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते.

    नवी दिल्ली – भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकर (Swatantrya Veer Sawarkar) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही नाराजी व्यक्त केली होती. मात्र, संजय राऊत हे लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

    मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान (Conclusion) भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा आपला प्रयत्न असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. तब्बल १०३ दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले होते.

    राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. संजय राऊत यांनी राजकीय विषयांवर भाष्य करणे टाळले. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींच्या टिकास्त्राच्या पार्श्वभूमीवर सावरकर आपलेच आहेत, या भूमिकेचा राऊत यांच्याकडून यावेळी पुनरुच्चार करण्यात आला आहे.