प्रतिक्षा आणि धाकधूक, मराठा आरक्षणाबाबत कोर्टानं निर्णय ठेवला राखून, आता होळीनंतरच कळणार फैसला

मराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेबाबत काय फैसला होतो, याकडे महाराष्ट्रासह पूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज (शुक्रवारी) याबाबत सर्वोच्च न्यायालय फैसला सुनावेल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय. आता पुढील आठवड्यात हा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलीय.

    गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असणारी लढाई एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलीय. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता न्यायालयाने अंतिम निकाल तयार केलाय.

    मराठा आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या याचिकेबाबत काय फैसला होतो, याकडे महाराष्ट्रासह पूर्ण देशाचं लक्ष लागलंय. आज (शुक्रवारी) याबाबत सर्वोच्च न्यायालय फैसला सुनावेल, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने हा निकाल राखून ठेवलाय. आता पुढील आठवड्यात हा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलीय.

    मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय या घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं सांगत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबतची सर्व सुनावणी पूर्ण झाली आणि आता निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. होळीनंतरच आता न्यायालयाने नेमका काय फैसला केलाय, ते समजणार आहे.

    हे सुद्धा वाचा

    या निर्णयाबरोबरच देशातील एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, या सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली दिलेल्या निर्णयाचाही पुनर्विचार करणार आहे. त्याचा फैसलादेखील पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.