वाझे आणि देशमुखांची भेट झालीच नव्हती, शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण

गृहमंत्री फेब्रुवारीध्ये कोरोनामुळे आधी रुग्णालयात आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कोणत्या आधारावर म्हणतात? असा प्रश्न विचारत वाझे-देशमुख(sachin waze and deshmukh didn't meet) भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार(sharad pawar) यांनी केला आहे.

    नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार(sharad pawar press conference) यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

    गृहमंत्री फेब्रुवारीध्ये कोरोनामुळे आधी रुग्णालयात आणि नंतर होम आयसोलेशनमध्ये होते. मग देशमुखांनी सचिन वाझेंना बोलावून वसुलीचे आदेश दिले असं सिंग कोणत्या आधारावर म्हणतात? असा प्रश्न विचारत वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

    यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रम सांगितला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केली. सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून ५ ते १५ फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा प्रश्न पवार यांनी विचारला.