
भारत लवकरच परदेशी पर्यटकांसाठी दीड वर्षानंतर आपले दरवाजे उघडू शकतो. देशात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यामुळे रुग्ण संख्येतील घट लक्षात घेऊन त्यावर विचार केला जात आहे. विदेशी पर्यटकांसाठी देशात केव्हापासून एन्ट्री द्यायची यासंबंधीची तारीख आणि नियमावली ठरविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय तांत्रिक उच्चाधिकार समितीशी चर्चा करत आहे.
दिल्ली : भारत लवकरच परदेशी पर्यटकांसाठी दीड वर्षानंतर आपले दरवाजे उघडू शकतो. देशात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्यामुळे रुग्ण संख्येतील घट लक्षात घेऊन त्यावर विचार केला जात आहे. विदेशी पर्यटकांसाठी देशात केव्हापासून एन्ट्री द्यायची यासंबंधीची तारीख आणि नियमावली ठरविण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय तांत्रिक उच्चाधिकार समितीशी चर्चा करत आहे.
मार्च 2020 पासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशव्यापी लॉकडाऊन घोषित झाल्यापासून पर्यटन, आदरातिथ्य आणि विमानसेवेवर विपरित परिणाम झाला आहे.
मात्र, आता पर्यटकांना दरवाजे खुले झाल्यास देशात पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटन व्यवसायाला पुन्हा बहर येऊ शकतो. याचदरम्यान पहिल्या पाच लाख विदेशी पर्यटकांना व्हिसासह अन्य सुविधांसाठी विशेष सूट देण्याचा विचार चालवला जात असल्याचे समजते.