निर्गुंतवणूक प्रक्रियेला वेग ; एअर इंडिया आता टाटा समुहाकडेच जाण्याची शक्यता

टाटा समुहाने सिंगापूर एअरलाईन्सला एअर इंडियासाठी बोली लावण्यासाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोरोना साथरोग कालावधीत झालेल्या तोट्यामुळे सिंगापूर एअरलाईन्सने यात रूची दाखविली नव्हती. तथापी एअर इंडिया टाटा समुहाकडेच जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.

    दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी टाटा समूह आणि स्पाईस जेटचे प्रमोटर अजय सिंह यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता टाटा समूह आणि अजय सिंह,यांची एअर इंडियाची खाते, करार आणि कर्ज आदी बाबींची पडताळणी केली जाईल. त्यानंतर कंपन्या आर्थिक बोली जमा करतील. बोली सादर करताना मात्र ते एअर इंडियाच्या कर्जाचा किती भार उचलू शकतात हे त्यांना स्पष्ट करावे लागणार आहे. शिवाय अनामत रक्कम किती जमा करणार याचीही माहिती देणे बंधनकारक केले जाणार आहे.

    दोन पक्षांपैकी ज्या कंपनीची बोली एअर इंडियासाठी सर्वाधिक आर्थिक मूल्य कोट करेल त्यालाच ही निविदा प्राप्त होणार आहे. यासाठी त्यानंतर एअर इंडियाच्या मूळ किमतीपेक्षा कमीत कमी 15 टक्के रोख रक्कम जमा करावी लागेल. उर्वरित रक्कम कंपनीला कर्ज म्हणून वापरता येईल. विशेष म्हणजे सद्यस्थितीत एअर इंडियावर तब्बल 90 हजार कोटींचे कर्ज आहे. दीपमद्वारा तयार करण्यात आलेल्या दस्तावेजात ३१ मार्च २०१९ रोजी एअर इंडियावर एकूण कर्ज ६००७४ कोटींचे होते. त्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात सरकारी विमान कंपनीला 10 हजार कोटींचा तोटा होण्याची शक्यता आहे.

    दरम्यांन टाटा टाटा समूह एअर इंडियासाठी आपली निविदा एअर एशिया इंडिया द्वारे सादर करणार आहे. एअर एशिया इंडियात टाटा समुहाची नियंत्रित भागीदारी आहे. अजय सिंह यांनी मध्यपूर्वेत सावरेन फंडसह एअर इंडिया खरेदी करण्याची योजना आखली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार टाटा समुहाने सिंगापूर एअरलाईन्सला एअर इंडियासाठी बोली लावण्यासाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोरोना साथरोग कालावधीत झालेल्या तोट्यामुळे सिंगापूर एअरलाईन्सने यात रूची दाखविली नव्हती. तथापी एअर इंडिया टाटा समुहाकडेच जाण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.