कोरोना संक्रमणातील भयानक दिवस! तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच २.४५ लाख नवे रुग्ण आणि ३७९ जणांचा मृत्यू; ओमायक्रॉच्या वाढत्या वेगाने चिंता वाढली

बुधवारचा दिवस कोरोना संक्रमणातील भयानक दिवस होता. बुधवारी देशभरात २ लाख ४५ हजार ५२५ नवे कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी एकाच दिवसात ३७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे(Terrible days in the corona transition! The third wave killed 2.45 lakh new patients and 379 people for the first time; Anxiety increased with the increasing speed of Omacro).

  नवी दिल्ली : बुधवारचा दिवस कोरोना संक्रमणातील भयानक दिवस होता. बुधवारी देशभरात २ लाख ४५ हजार ५२५ नवे कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी एकाच दिवसात ३७९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे(Terrible days in the corona transition! The third wave killed 2.45 lakh new patients and 379 people for the first time; Anxiety increased with the increasing speed of Omacro).

  एक्टिव्ह असलेल्या रुग्णांच्या संख्येत, ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, अशांच्या संख्येत १ लाख ६१ हजार २७१ एवढी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सध्या देशात ११.१० लाख कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच ही रुग्ण संख्या ११ लाखांच्या वर पोहचली आहे.

  राजधानी दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्येही कोरोनाची रुग्ण संख्या चिंताजनक आहे. दिल्लीतील पॉझटिव्हिटी दर २६.२२ टक्क्यांवर पोहचला आहे. हा गेल्या सात महिन्यातील सर्वाधिक दर आहे.

  देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढताना दिसते आहे. आत्तापर्यंत ५४८८ रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचा पॉझिटिव्हिटी दर १३.११ टक्क्यांवर पोहचला आहे.

  वाढत्या रुग्णसंख्येमुळे सत्ताधारी आणि प्रशासन यांची काळजी वाढली आहे. येत्या काळात कठोर निर्बंध घातले जातील का, याचीही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022