That's it! Woman dies after tube gets stuck in throat during corona swab test

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. अशातच एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. कोरोनाची स्वॅब टेस्ट करताना नळी घशात अडकल्याने महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. कोरोना तपासणी केद्रांवर घडलेला हा भयंकर प्रकार म्हणजे निष्काळजीपणाचा कहर असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

    नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे. अशातच एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. कोरोनाची स्वॅब टेस्ट करताना नळी घशात अडकल्याने महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. कोरोना तपासणी केद्रांवर घडलेला हा भयंकर प्रकार म्हणजे निष्काळजीपणाचा कहर असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

    जासो देवी असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

    जासो देवी कोरोना लस घेण्यासाठी गेली होत्या. मात्र लस घेण्याआधी त्यांना कोरोना टेस्ट करण्यास सांगीतले. स्वॅब टेस्ट करताना त्यांच्या तोंडामध्ये तपासणीसाठी किट घालण्यात आलं तेव्हा ते गळ्यामध्येच अडकून राहीलं.

    यामुळे जासो देवी यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. हे किट घशात अडकल्यानेच मृत्यू झाल्याचा दावा जासो देवी यांच्या पतीने केला आहे.