The 5 passengers from London, Corona Positive, raised concerns in India

सोमवारी एकूण २६६ प्रवाशी विदेशातून भारतात दाखल झाले आहेत. सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामधील ५ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे.

दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे लंडनसह (London) युरोपातील काही देशांत कोरोना पुन्हा फोफावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घातली आहे. परंतु सोमवारी लंडनहून आलेले ५ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळले आहेत. त्यामुळे भारताच्या (India ) चिंतेत चांगलीच भर पडली आहे.

सोमवारी एकूण २६६ प्रवाशी विदेशातून भारतात दाखल झाले आहेत. सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामधील ५ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

भारताने कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कडक पाऊले उचलत आंतरराष्ट्रीय विमानंवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. तसेच युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी तर ईतर देशातून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांच्या विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे. असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे.