women in indian army

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमीमध्ये(Naval Academy) आता महिला कॅडेट्सना(Girls May Join NDA) प्रवेश घेता येणार आहे. सरकारने या दोन्ही संस्थांमध्ये महिला कॅडेट्सना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल, आयएएफ दलांच्या प्रमुखांनी यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, महिलांचा NDA प्रवेश (NDA women Admissions) पुढील वर्षीपासून सुरु करण्यात यावा असं केंद्र सरकारनं सुचवलं होतं. केंद्राने या संदर्भात केलेली याचीक सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमीमध्ये(Naval Academy) आता महिला कॅडेट्सना(Girls May Join NDA) प्रवेश घेता येणार आहे. सरकारने या दोन्ही संस्थांमध्ये महिला कॅडेट्सना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल, आयएएफ दलांच्या प्रमुखांनी यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, महिलांचा NDA प्रवेश (NDA women Admissions) पुढील वर्षीपासून सुरु करण्यात यावा असं केंद्र सरकारनं सुचवलं होतं. केंद्राने या संदर्भात केलेली याचीक सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

    महिलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीमध्ये प्रवेश देण्यासाठी काही पायाभूत आणि अभ्यासक्रमातील बदल आवश्यक असल्याचे केंद्र सरकारते म्हणणे आहे. या बदलांसाठी महिलांना एनडीए प्रवेशासाठी सहभागी होण्यासाठी मे 2022 पर्यंत वेळ देण्यात यावा अशी मागणी केंद्र सरकारने याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

    एनडीएकडून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी एका वर्षात दोन परीक्षा घेतल्या जातात. तर, महिलांना केवळ 2022 च्या परीक्षा देण्याची परवानगी का? असा सवाल उपस्थित करत महिलांच्या प्रवेशाला स्थगिती (Supreme court decision on women NDA admissions) देता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

    प्रवेशाचा निर्णय 2022 पर्यंत लांबणीवर टाकल्यास महिलांना थेट 2023 एनडीएमध्ये प्रवेश घेता येईल. यामुळे NDA मध्ये महिलांचा प्रवेश पुढे ढकलल्या जाऊ शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सशस्त्र दल चांगलं प्रशिक्षित आहे. असे असताना महिलांच्या प्रवेशासाठी ते अधिक जलद उपाय शोधावेत असे न्यायालयाने सुचवले आहे.