ट्रायला दिलेली आकडेवारी चुकीची: व्होडाफोन

जानेवारीत व्होडाफोनने १७ लाख नवे ग्राहक जोडल्याचे म्हटले होते. तथापि कंपनीने त्रुटीचे विवरण मात्र दिले नाही. परंतु जाणकारांनी उत्तर प्रदेशातील ग्राहकांच्या संख्येतच ही त्रुटी झाल्याचे म्हटले आहे.

    दिल्ली: जानेवारी२०२१मध्ये भारीत दूरसंचार नियामक प्राधिकरणाला (ट्राय) दिलेल्या ग्राहकसंख्येत त्रुटी होती अशी कबुली व्होडाफोन आयडियाने दिली आहे.तथापि ही त्रुटी सुधारण्यात आली असून नवी आकडेवारी दिली असल्याचेही व्होडाफोनने स्पष्ट केले. जानेवारीत व्होडाफोनने १७ लाख नवे ग्राहक जोडल्याचे म्हटले होते. तथापि कंपनीने त्रुटीचे विवरण मात्र दिले नाही. परंतु जाणकारांनी उत्तर प्रदेशातील ग्राहकांच्या संख्येतच ही त्रुटी झाल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशात ग्राहकसंख्या वाढल्याचा दावा करण्यात आला होता.