कोरोना रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्यास उद्योगक्षेत्र संकटात येईल; एएचएआरचे शिवानंद शेट्टी यांचे मत

देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने उद्योगधंद्यांना पुन्हा लाॅकडाऊनचा धोका जाणवत आहे. या औचित्यावर इंडियन हाॅटेल अँड रेस्टोरेंट असोसिएशनचे (एएचएआर) अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी केंद्र अथवा राज्य शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्यास उद्योगक्षेत्र तीव्र संकटात सापडू शकते असे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेऊन ‘एएचएआर’च्या धोरणांविषयी माहिती दिली.

दिल्ली (Delhi).  देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने उद्योगधंद्यांना पुन्हा लाॅकडाऊनचा धोका जाणवत आहे. या औचित्यावर इंडियन हाॅटेल अँड रेस्टोरेंट असोसिएशनचे (एएचएआर) अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी केंद्र अथवा राज्य शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्यास उद्योगक्षेत्र तीव्र संकटात सापडू शकते असे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेऊन ‘एएचएआर’च्या धोरणांविषयी माहिती दिली.

शिवानंद म्हणाले, आम्‍ही युकेमध्‍ये आढळून आलेल्‍या नवीन प्रकारच्‍या कोरोनाविषाणूच्‍या उद्रेकाबाबत महामारीशी सामना करणा-या राज्‍य सरकारसोबत चिंता व्‍यक्‍त केली आहे. ७ महिन्‍यांच्‍या लॉकडाऊननंतर आम्‍ही सर्व एसओपींचे पालन करत स्थिती सुरळीत होण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत. आमच्‍या सदस्‍यांना एसओपींचे काटेकोरपणे पालन करण्‍याचे सांगितले आहे. मात्र सध्या एवढेच सांगू शकतो की, अधिक कडक उपाययोजना केल्‍यास उद्योगक्षेत्र तीव्र संकटात सापडू शकते.

शिवानंद यांच्या माहितीनुसार, ऑक्‍टोबर महिन्‍यामध्‍ये लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्‍यानंतर देखील अनेक रेस्‍टॉरण्‍ट्स सुरू झालेली नाहीत. यामधून ते कायमस्‍वरूपी बंद झाल्‍याचे दिसून येते. त्यांनी याचा नेहमीच उल्‍लेख केला आहे. यामुळे आता ‘एएचएआर’ कडून सरकारला कामकाजाचे तास वाढवण्‍याची विनंती करण्यात आली आहे. ज्‍यामुळे रेस्‍टॉरण्‍ट व बार मालकांना लोकांच्‍या होणा-या गर्दीवर उत्तम पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासोबत व्‍यवस्‍थापन करणे शक्य होईल.