The peaks of the Himalayas are melting, a serious warning to scientists; Major rivers will flow along the Ganges

हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे विलोभनीय दिसतात. त्यांच्यावर साचणाऱ्या बर्फामुळे इथे वाहणाऱ्या नद्या बाराही महिने प्रवाहित असतात. पण, हे चित्र हळूहळू बदलत असल्याचा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. एका अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. इंग्लंड येथील यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या शास्त्रज्ञांनी हा स्टडी अहवाल प्रकाशित केला आहे(The peaks of the Himalayas are melting, a serious warning to scientists; Major rivers will flow along the Ganges).

  दिल्ली : हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे विलोभनीय दिसतात. त्यांच्यावर साचणाऱ्या बर्फामुळे इथे वाहणाऱ्या नद्या बाराही महिने प्रवाहित असतात. पण, हे चित्र हळूहळू बदलत असल्याचा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. एका अहवालात हा इशारा देण्यात आला आहे. इंग्लंड येथील यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या शास्त्रज्ञांनी हा स्टडी अहवाल प्रकाशित केला आहे(The peaks of the Himalayas are melting, a serious warning to scientists; Major rivers will flow along the Ganges).

  या अहवालानुसार, हिमालयाची शिखरे जगातील अन्य शिखरांच्या तुलनेने अधिक वेगाने वितळत आहेत. मानवी इतिहासात जेव्हा छोटे हिमयुग आले होते. तेव्हा हिमशिखरे वितळण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यानंतर झालेल्या बदलांचा आढावा शास्त्रज्ञांनी घेतला. त्यांनी हिमालयाच्या 14 हजार 798 हिमशिखरांचे अध्ययन केले. त्यांचा पृष्ठभाग, बर्फाची पातळी, रुंदी, जाडी आणि वितळण्याचा वेग यांचा अभ्यास करण्यात आला. या शास्त्रज्ञांनी या अभ्यासांती काही इशारे दिले आहेत. यात सगळ्यात गंभीर इशारा ग्लेशियर वितळण्याचा आहे.

  दसपटीने वाढला वेग

  हिमयुगात बर्फ वितळण्याचा कमी झालेला वेग गेल्या काही वर्षांत दसपटीने वाढला आहे. त्यामुळे हिमशिखरांनी आपला 40 टक्के भाग गमावला आहे. ही हिमशिखरे 28 हजार चौ किमीपासून 19 हजार 600 किमीपर्यंत आली आहेत. या शिखरांवरून 390 क्युबिक किमी ते 590 क्युबिक किमी इतका बर्फ वितळून गेला आहे. हा बर्फ वितळल्याने जे पाणी वाहून गेले त्या पाण्यामुळे समुद्राच्या पातळीत 0.92 मिलीमीटर ते 1.38 मिलीमीटर इतकी वाढ झाली आहे.

  पिण्याच्या पाण्याची कमतरता

  आर्क्टिक आणि अंटार्टिकानंतर सर्वात जास्त बर्फ हा हिमालयावर आहे. त्यामुळे अनेकदा त्याला तिसरा ध्रुव देखील म्हटले जाते. पण, हा बदल झाल्याने भविष्यात अनेक आशियाई देशांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू शकते. कारण, आशियाच्या प्रमुख नद्यांमध्ये ग्लेशियरमधून वितळणाऱ्या बर्फाचे पाणी आहे. यात प्रामुख्याने गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या तीन नद्यांचा समावेश होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळल्याने भविष्यात भारत, नेपाळ, चीन, बांग्लादेश, भूतान, पाकिस्तान या देशांसह अनेक देशांना पाण्याचा भीषण तुटवडा जाणवू शकतो. कारण, या देशांमधील प्रमुख नद्या या हिमालयाच्या ग्लेशियरमध्येच उगम पावतात.

  छोट्या सरोवरांची निर्मिती

  वातावरणातील बदलांमुळे अनेक हिमशिखरे वितळून त्यांच्या मध्य पायथ्याशी छोटी सरोवरे निर्माण झाली आहेत. ही सरोवर अत्यंत धोकादायक आहेत. कारण, पर्वताच्या मध्यावर अशा प्रकारे तयार झालेल्या सरोवरांचे बांध कधीही फुटू शकतात आणि त्यातून पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन केदारनाथ किंवा रैणीसारखी दुर्घटना उद्भवू शकते, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.