थरारक ! विमानाने उड्डाण घेताच हवेत घडला धक्कादायक प्रकार, इमरजन्सी दरवाजा उघडायला गेला अन्…

हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला. दरम्यान क्रू मेंबर आणि अन्य प्रवाशांनी या प्रवाशाला चांगलीच शिक्षा दिली आणि वाराणसीपर्यंत बांधून ठेवलं. शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी स्पाईसजेट विमान ८९ प्रवाशांना घेऊन वाराणसीसाठी निघाले.

    दिल्लीहून शनिवारी दुपारी स्पाईसजेट विमानाने वाराणसीला उड्डाण घेतली होतं. परंतु विमानाने हवेत उड्डाण घेतलं असता, एका व्यक्तीने विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे लोकांनी विमानात एकच गोंधळ घातला. या थरारक घटनेचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला. दरम्यान क्रू मेंबर आणि अन्य प्रवाशांनी या प्रवाशाला चांगलीच शिक्षा दिली आणि वाराणसीपर्यंत बांधून ठेवलं. शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी स्पाईसजेट विमान ८९ प्रवाशांना घेऊन वाराणसीसाठी निघाले.

    विमानात बसलेल्या गुरूग्रामच्या रहिवासी असलेल्या प्रवाशाने अचानक गोंधळ घालायला सुरूवात केली. आपातकालीन खिडकी उघडली त्यामुळे प्रवाशी घाबरले. जेव्हा या माणसाला आवर घालण्यासाठी क्रू मेंमर्स आणि इतर लोक धावून गेले तेव्हा या माणसानं जास्त गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा कसंबसं त्याला शांत बसवलं आणि बांधून ठेवलं.