New Covid variant Omicron: access to public transport only after taking two doses; Penalty action up to Rs 10000

दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशात दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या उत्परीवर्तीत प्रकार ओमायक्रॉनमुळे भारतातही धाकधुक वाढली आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारची ओमायक्रॉनमुळे चिंचा वाढली आहे. ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) म्हणणे आहे. मात्र, भारतासाठी सध्यातरी दिलासादायक स्थिती आहे. देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली(There is not a single omycron patient in the country; Information of Union Health Minister Mansukh Mandvi). संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीने तपासणी केली जात असल्याचे मांडवीय यांनी सांगितले.

    दिल्ली : दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशात दहशत माजवणाऱ्या कोरोनाच्या उत्परीवर्तीत प्रकार ओमायक्रॉनमुळे भारतातही धाकधुक वाढली आहे. केंद्र सरकारसह राज्य सरकारची ओमायक्रॉनमुळे चिंचा वाढली आहे. ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) म्हणणे आहे. मात्र, भारतासाठी सध्यातरी दिलासादायक स्थिती आहे. देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली(There is not a single omycron patient in the country; Information of Union Health Minister Mansukh Mandvi). संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीने तपासणी केली जात असल्याचे मांडवीय यांनी सांगितले.

    नवा व्हायरस जगभरातील 14 देशांमध्ये आढळून आला आहे. परंतु, भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधने, प्रयोगशाळा आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करू शकतो. आजच्या घडीला देशात कोरोनाचा नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगीतले.

    16 देशांमध्ये रुग्णांची नोंद

    ओमायक्रॉन वेरियंट संसर्ग आतापर्यंत 16 देशांमध्ये पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन बाधित रुग्ण सर्वप्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला. ओमायक्रॉनचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे. दरम्यान, भारतात आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याबाबत विचार सुरू आहे.

    महानगरपालिका धास्तावल्या

    ओमायक्रॉनची राज्यातील महानगर पालिकांना चांगलीच धास्ती भरली आहे. यामुळेच की काय, मुंबई, पुणे, नाशिकसह औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. मुंबईतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबर सुरू होणार होत्या. पण आता त्या 15 डिसेंबरपासून उघडण्यात येतील. ओमायक्रॉनचे संभाव्य धोके लक्षात घेऊन मुंबई महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, पुण्यात 15 डिसेंबर, नाशिक 10 डिसेंबरनंतर तर औरंगाबादमध्ये 5 डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे.

    दक्षिण अफ्रिकेतून पुण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे!

    पुणे शहरात दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे. दक्षिण अफ्रिकेतून पुण्यामध्ये एक प्रवाशी दाखल झाला असून त्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहेत. पण अद्याप या व्यक्तीचा तपासणी अहवाल समोर आलेला नाही, तो आल्यानंतर याबाबत नक्की काय ते सांगता येईल, असे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.