या सहा राज्यांत देशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण, गेल्या २४ तासांत २५१ मृत्यू

महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचं सिद्ध झालंय. या सहा राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या ही देशातील रुग्णांच्या ८०.६३ टक्के आहे. म्हणजेच देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ८१ टक्के रुग्ण हे सहा राज्यांत असल्याचं दिसून आलंय. 

    कोरोनाने देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं चित्र आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत असलं तरी मुख्यत्वे सहा राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याची आकडेवारी समोर आलीय.

    महाराष्ट्र, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचं सिद्ध झालंय. या सहा राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या ही देशातील रुग्णांच्या ८०.६३ टक्के आहे. म्हणजेच देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ८१ टक्के रुग्ण हे सहा राज्यांत असल्याचं दिसून आलंय.

    देशात कोरोनाच्या नव्या ५३,४७६ केसेस आढळल्या आहेत. २६,४९० जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २५१ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. गेल्या २४ तासांतील ही आकडेवारी आहे.

    एकूण देशभरात १ कोटी १७ लाख जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी १ कोटी १२ लाख जण बरे झालेत. सुमारे ३ लाख ९५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण ५ कोटी ३१ लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय.