एका दिवसापूर्वी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अदिती सिंह यांना भाजपाने रायबरेलीतून दिले तिकीट

उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी भाजपाने आपले थीम सॉन्ग लॉन्च केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. ‘सोच इमानदार, काम दमदार’, हा विचार गाण्यातून घेऊन जनतेपर्यंत जाण्याचा भाजपाचा मानस आहे.

    नवी दिल्ली- भाजपाने उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी (UP Election) तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात ८५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात रायबरेलीतून अदिती सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. अदिती सिंह यांनी २० जानेवारी, गुरुवारी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर अदिती सिंह यांनी ही निवडणूक जिंकली होती. आता भाजपात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना, पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

    भाजपाचा प्रचार
    उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी भाजपाने आपले थीम सॉन्ग लॉन्च केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गाण्याचे लॉन्चिंग करण्यात आले. ‘सोच इमानदार, काम दमदार’, हा विचार गाण्यातून घेऊन जनतेपर्यंत जाण्याचा भाजपाचा मानस आहे. डिजिटल माध्यमातून राज्य सरकारचे काम जनेतपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार आणि भाजपाने सर्वाधिक प्रयत्न केलेले आहेत.