२०२१ मध्ये होणार ‘हे’ मोठे बदल, तुमच्या जीवनावर होणार थेट परिणाम

फास्टॅग, व्हॉट्सॲप, चेक पेमेंट, UPI पेमेंट सिस्टिम, लँडलाईन नंबर आणि जीएसटी रिटर्नच्या (Rules Changing In 2021 ) नियमात हे बदल होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नुकसान टाळायचे असल्यास या नियमांबाबत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

२०२१ मध्ये नवीन वर्षात काही मोठे बदल पहायला मिळणार आहेत. त्यामुळे १ जानेवारीपासून (Rules changing from January 1) सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. फास्टॅग, व्हॉट्सॲप, चेक पेमेंट, UPI पेमेंट सिस्टिम, लँडलाईन नंबर आणि जीएसटी रिटर्नच्या नियमात हे बदल होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नुकसान टाळायचे असल्यास या नियमांबाबत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

सर्व चारचाकी वाहनांसाठी FasTag अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry of Road Transport and Highways) १ जानेवारी २०२१ पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली आहे. १ डिसेंबर २०१७ पूर्वी विकण्यात आलेल्या फोर-व्हील किंवा एम अँड एन श्रेणी वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य असेल. त्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ (Central Motor Vehicles Rules, 1989) मध्ये बदल करण्यात आले आहेत.

कारच्या किंमती वाढतील

वाहन उत्पादक २०२१ मध्ये नवीन किंमतीसह सुरुवात करण्याची तयारी करत आहेत. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुढील महिन्यापासून त्याच्या मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्यास सुरवात करेल. मॉडेल्सप्रमाणे ही किंमत बदलेल. एमजी मोटरने जाहीर केले आहे की ते पुढील वर्षी भारतात किंमती वाढवणार आहेत.

कॉन्टॅक्टलेस कार्ड्स वापरून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड्स वापरून होणाऱ्या ट्रान्झॅक्शनची मर्यादा (Contactless card transaction limit) वाढवली आहे. ही मर्यादा २००० रूपयांवरून ५००० रू. इतकी करण्यात आली आहे.

चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) चेकच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay system) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने हा निर्णय चेक पेमेंटमधील फ्रॉड रोखण्यासाठी घेतला आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर ५०,००० आणि त्यापेक्षा अधिक रक्कम चेकच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली लागू होईल.

लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी शून्य जोडावा लागणार

डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन्स (Department of Telecommunications – DoT) ने लँडलाइन वरुन मोबाइलवर कॉल करण्याआधी 0 (शून्य) जोडणे अनिवार्य केलं आहे. हा नियम १५ जानेवारी २०२१ पासून लागू होईल.

UPI पेमेंटमध्ये बदल

१ जानेवारी २०२१ पासून UPI च्या माध्यमातून पेमेंट करणं महागणार आहे. थर्डपार्टीकडून चालवण्यात येणाऱ्या apps वर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.

निवडक फोन्समध्ये व्हॉट्सॲप बंद होईल

व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) पासून सुरू होणाऱ्या OS वरच व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू शकणार आहे.