bharat bandh in delhi

शेतकऱ्यांनी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची(Bharat Bandh हाक दिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीच्या(Delhi) सीमेवर कडेकोट सुरक्षा (Security In Delhi) व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

    केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीतून देशव्यापी भारत बंदची(Bharat Bandh) हाक दिली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीच्या(Delhi) सीमेवर कडेकोट सुरक्षा (Security In Delhi) व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी(Vehicle Cheking In Delhi) होत आहे. मात्र, यामुळे दिल्ली गुडगाव सीमेवर (Delhi Gudgaon Border) शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या प्रत्येक सीमेवर अशीच परिस्थिती आहे.


    लोकांनी वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त केल्यानंतर राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, “नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच देण्यात आली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सांयकाळी ४ या वेळेत वाहतूक खोळंबा होऊ शकतो याबाबत आम्ही आधीच सतर्क केलं होतं. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केलं त्यांना या अडचणीला सामोरं जावं लागत आहे.”


    “नागरिकांनी दुपारच्या जेवणानंतर घराबाहेर पडावं असं आम्ही नागरिकांना आवाहन केलं होतं. मात्र, याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेऊ. यासाठी १० वर्षे लागली तरी चालतील,” असंही राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.